Posts

Showing posts from June, 2020

पहिला पाऊस..!!

Image
  व.पू.काळे यांनी सांगितल्याप्रमाणे "पाऊस सर्वत्र सारखाच पडत असतो फक्त प्रत्येकाच भिजणं हे वेगळं असते".मग तो बळीराजा असो वा प्रियकर-प्रेयसी, मोठ्या शहरातील माणूस असो वा गावातील मध्यम वर्गीय माणूस असो. सर्वांच्या दृष्टीस तो वेगळ्या पद्धतीने भासत असतो. तोच पहिला पाऊस कोणासाठी आशेचा सुखद किरण असतो तर कोणासाठी निराशा घेऊन येतो.      पहिला पाऊस हा शेतकरी वर्गासाठी एक पर्वणी असतो.त्या मध्ये खरीप पिकांचे नियोजन केले जाते.परंतु निसर्गाची बदलती खुबी लक्ष्यात घेता शेतकऱ्याच्या सुखाचं रूपांतर नैराश्यात होताना दिसून येत आहे. बदलत जाणारं मान्सून च चक्र या सर्व गोष्टी याला जबाबदार आहेत.हाच पहिला पाऊस बळीराजाच्या शेवट करताना दिसतो. प्रियकर आणि प्रेयसी यांच्या साठी पहिला पाऊस हा सदैव स्मरणात राहील असा असतो. त्यात भिजणं आणि  त्या आठवणी जाग्या ठेवण खूप सुंदर असते.मग त्याचं पाऊसा मधे दोघं आपल्या पहिला प्रेमाचं आणि पहिला पाऊसच दर्शन घडवत असतात. त्याचं पाऊसा मधे सर्वत्र गारवा पसरतो पशु पक्षी सैर वैर होऊन पावसामध्ये तल्लीन होऊन भिजत असतात. त्याचं बरोबर उकाड्यापासून सुटका हो...

साध्य आणि साधक..!!

Image
माणूस आणि त्याच्या कडे असलेल्या साधनाचा उपयोग..!!  विवेकानंद यांच्या साहित्य मधला हा एक लेख आहे त्याच विश्लषण माझ्या माध्यमातून करत आहे.त्यांचा हा दूरदृष्टी असलेला एक विचारमश नेहमी निराशेतून आशेच्या किरण दाखवत असतो तो म्हणजे साध्य आणि साधक.माणसाला यश हवं असेल तर त्याचे साध्य त्याला माहिती हवे आणि यशची हमी पूर्ण हवी असेल तर साधक असणे गरजेचे आहे.आपण पुरातन काळापासून पाहत आलो आहे की आपण साध्य, साधन आणि साधक या गोष्टींचा उल्लेख केलेला दिसून येतो.माणसाचा स्वभाव हा एक विनाश काळी विपरित बुध्दी असा आहे कारण आपण अताच्या माणसाचा उल्लेख केला तर कारण आता आपण सामाजिक माध्यम आपलं साध्य झालं आहे आणि तेच आपलं जीवन.इथे मी त्या गोष्टींचा उहापोह करू इच्छितो की माणूस हा काय साध्य करू इच्छितो आणि त्याचे सखोल परिणाम आपणच भोगत आहोत.निसर्गाला पोहचत असलेली हानी असो वा त्याला पाहिजे असलेली संपती ती देणं आहे निसर्गाची.या गोष्टींचा अती वापर हा माणसाला निराशेच्या दरीत ढकलत आहे म्हणून सरते शेवटी येवडच सांगेल की माणसाने साध्य आणि साधक काय आहे समजून घ्यावं.