पहिला पाऊस..!!
व.पू.काळे यांनी सांगितल्याप्रमाणे "पाऊस सर्वत्र सारखाच पडत असतो फक्त प्रत्येकाच भिजणं हे वेगळं असते".मग तो बळीराजा असो वा प्रियकर-प्रेयसी, मोठ्या शहरातील माणूस असो वा गावातील मध्यम वर्गीय माणूस असो. सर्वांच्या दृष्टीस तो वेगळ्या पद्धतीने भासत असतो. तोच पहिला पाऊस कोणासाठी आशेचा सुखद किरण असतो तर कोणासाठी निराशा घेऊन येतो.
पहिला पाऊस हा शेतकरी वर्गासाठी एक पर्वणी असतो.त्या मध्ये खरीप पिकांचे नियोजन केले जाते.परंतु निसर्गाची बदलती खुबी लक्ष्यात घेता शेतकऱ्याच्या सुखाचं रूपांतर नैराश्यात होताना दिसून येत आहे. बदलत जाणारं मान्सून च चक्र या सर्व गोष्टी याला जबाबदार आहेत.हाच पहिला पाऊस बळीराजाच्या शेवट करताना दिसतो.
प्रियकर आणि प्रेयसी यांच्या साठी पहिला पाऊस हा सदैव स्मरणात राहील असा असतो. त्यात भिजणं आणि त्या आठवणी जाग्या ठेवण खूप सुंदर असते.मग त्याचं पाऊसा मधे दोघं आपल्या पहिला प्रेमाचं आणि पहिला पाऊसच दर्शन घडवत असतात.
त्याचं पाऊसा मधे सर्वत्र गारवा पसरतो पशु पक्षी सैर वैर होऊन पावसामध्ये तल्लीन होऊन भिजत असतात. त्याचं बरोबर उकाड्यापासून सुटका होते..!!
पहिला पाऊस आणि मेट्रो सिटी याचं तर एक अतुट नातं आपल्याला दिसून येते.पाण्याचं नियोजन करणे. नाल्या, नद्यांचे पात्र साफसफाई करणे या सर्व गोष्टींना प्राधान्य दिले जाते.त्यात मुंबई शहराच अव्वल स्थान आहे.यांच्या साठी पहिला पाऊस हा संकट म्हणून येतो. त्याचप्रमाणे कोकणात तो विध्वंसक दिसतो.त्याचबरोबर पंचगंगा नद्यांना पूर परिस्थिती निर्माण होते.या लोकांना पहिला पाऊस म्हणजे एक धास्तीच असावी.अशा प्रकारे पहिला पाऊस हा प्रत्येकासाठी वेगळा असतो.
..................................................पहिला पाऊस..!!


Much better than privious 😊
ReplyDeleteThank you..🙏🙏
ReplyDelete